गटानुसार

मनोगत,   गझल, हझललेख / गूढकथा,  English Poemsमराठी [ कविता, चारोळ्या, हायकू], हिंदी [ शेर ]

अनुक्रमाणिका

वाचन सुरू ठेवा “गटानुसार”

भिजुनी चिंब ओले

वळवाच्या पहिल्या धारा
पडले पहिले थेंब टपोरे
मृद्गंधाच्या परिमलाने
मन सुखावुनी दरवळले

आळवला राग असावा
मल्हार तानसेनाने
या बरसत श्रावणधारा
मन भिजुनी चिंब ओले

सर्वदूर अवतीभवती
कडकडाड कडकड बिजली
गडगडाट मेघडंबरी
मन मनात घाबरलेले

कोसळल्या संततधारा
तटतटून जलाशय फुगले
शिशिराच्या वाटेवरती
मन अपार ओथंबलेले

आधुनिक मनाचे श्र्लोक

मना सांप्रती शुध्द वागू नको रे
अशाने भले व्हायचे ना तुझे रे
जनी मान्य तितुकेच बोलीत जा रे
अती सत्य ते फार बोलू नको रे

मना वासना होतसे मर्त्य लोकी
तुझा जन्म ही वासनेच्या मुळे रे
जमे तेवढी तीच पुरवीत जावी
तिची चारचौघात कबुली नको रे

मना काय वाटेल ते ते करावे
कधी पाप की पुण्य ते ना पहावे
मुखी नाम नी दान पेटीत द्यावे
पुरा भार रामावरी सोपवा रे

मना रे कधी शल्य बोचेल जीवा
विवेकी सुई फार टोचेल जीवा
तरी घेतला मार्ग सोडू नको रे
जमा खर्च वाह्यात मांडू नको रे

हक्क

मी एक या जगात, आणि अनंत लोकं
पदरात एक हिस्सा, त्यावर अनंत हक्क

सर्वांस तीच दृष्टी, नजरेत तेच चित्रं
पण अर्थ त्या विदेचा, बुद्धिनुसार भ्रष्ट
हत्ती व सात अंध वदती भ्रमीत सत्य
असुनी नसे पुरेसा, सूर्यप्रकाश लख्ख
पदरात एक हिस्सा, त्यावर अनंत हक्क

ज्याचा न थांग काही असला इथे पसारा
एकेक थेंब आला, पडला, विरून गेला
पण मालकी स्वतःची सांगे हरेक झक्क
केला असा जगाचा व्यापार डाव चक्क
पदरात एक हिस्सा, त्यावर अनंत हक्क

हा देश हा पसारा हिस्सा तयात एक
व्हावे भले जगाचे वाटे मनामनात
स्वार्थापुढे परंतु ना देश ना निसर्ग
अपुल्याच वागण्याने आपण स्वतःच थक्क !
पदरात एक हिस्सा, त्यावर अनंत हक्क

Cabbie

(ग्राहक)
Cabbie ना जाओ छोड़ कर
के deal अभी हुआ नहीं

अभी अभी बुलाया हैं, अभी अभी तो
अभी अभी बुलाया हैं
जाना कहां बताया हैं
सामान तो चढाने दे
मुझे तशरीफ़ तो लाने दे
meter शुरू तो कर जरा

meter शुरू तो कर जरा
शीशे भी ले नीचे जरा
मैं थोड़ी सांस भी तो लूं
गंदी हवा जी भर जो लूं
गंदी हवा जी भर जो लूं
तू ने तो कुछ कहा नहीं
मैं ने तो कुछ सुना नहीं

Cabbie ना जाओ छोड़ कर
के deal अभी हुआ नहीं

(Cabbie)
भई जो भोर हम उठें
भई जो भोर हम उठें
बहुत तिलमिला उठें
मुझे है भाडा ढूँढ़ना

मुझे है भाडा ढूँढ़ना
ना छोटा-मोटा सोचना
छोटा ये deal करू अभी
कमा ना पाऊँगा कभी
यहीं कहोगे तुम सदा
के deal अभी नहीं हुआ
जो ख़त्म हो किसी तरह
ये ऐसा मामला नही

(ग्राहक)
अभी नहीं अभी नहीं

(Cabbie)
नहीं नहीं नहीं नहीं

(ग्राहक)
Cabbie ना जाओ छोड़ कर
के deal अभी हुआ नहीं

अधूरी राह छोड़ के
अधूरी बात छोड़ के
यूं तुम निकल जो जाओगे
तो किस के काम आओगे
के जिंदगी के दौर में
बड़ी डिलों की चाह में
छोटी ड़ीलें जो छोड़ोगे
तो बददुआ ही झेलोगे
Cabbie ना deal ये तोड़ना
अनुरोध हैं गिला नहीं

(Cabbie)
हां यहीं कहोगे तुम सदा
के deal अभी हुआ नहीं

(ग्राहक)
हां deal अभी हुआ नही

(Cabbie)
नहीं नहीं नहीं नहीं

गुमराह

एक तरही ग़ज़ल मुकाबले में हम शरीक हुए थे ।
कैफ़ी आज़मी साहब की एक ग़ज़ल का मिसरा दिया था आयोजकों ने । वहीं मिसरा ले कर उसी बहर, काफिया और रदीफ के साथ ६ अशआर लिखने थे ।
तरही मिसरा था “डूबेंगे हम ज़रूर मगर नाख़ुदा के साथ” ।

इसी मुक़ाबले में हमारी कोशिश थी यह ग़ज़ल ।


वाक़िफ़ हुई रुखाई अब है नुमा के साथ
बेचैन हैं खुदाई भी अब खुदा के साथ
واقِف ھوئی رُخائی اب ھے نُما کے ساتھ
بےچین ھے خُدائی بھی اب خدا کے ساتھ

गुमराह हो गए हम तो रहनुमा के साथ
डूबेंगे हम ज़रूर मगर नाख़ुदा के साथ
گُمراہ ھو گئے ھم تو رھنُما کے ساتھ
دُوبینگے ھم ضرور مگر ناخُدا کے ساتھ

यूं ही नहीं बना अफ़साना सफर मेरा
हम बेनकाब ही सफर चले वफ़ा के साथ
یوں ھی نھیں بنا افسانہ سفر میرا
ھم بےنقاب ھی سفر چلے وفا کے ساتھ

परवाह थी हमे कब अंज़ाम की कभी
इल्ज़ाम हो रहे हम पर ब-खुदा के साथ
پرواہ تھی ھمیں کب انجام کی کبھی
اِلزام ھو رھے ھم پر بخدا کے ساتھ

जब इश्क़ को मरकज़ तवज्जोह दे गए
बदनाम हो गये हम ऐसी अना के साथ
جب عشق کو مرکز توجہ دے گئے
بدنام ھو گئے ھم ایسی اناء کے ساتھ

इस शहर की झरिन चकाचौंध रोशनी
गुमनाम कर रही सबको इल्तिज़ा के साथ
اس شھر کی زرّین چکاچوند روشنی
گُمنام کر رھی سب کو اِلتجا کے ساتھ

हर चीज मिल रही है सब को नसीब से
हम को हुई नसीब कडे इम्तिहाँ के साथ
ہر چیز مل رھی ھے سب کو نصیب سے
ھم کو ھی نصیبو کڑے اِمتحان کے ساتھ


वाक़िफ़ = acquainted with
रुखाई = rudeness/indifference
नुमा = showing, exhibiting

रहनुमा = guide, leader
नाख़ुदा = boatman, sailor, the master or commander of a ship

ब-खुदा = swear by God

मरकज़ = the centre, the centre ofa circle
तवज्जोह = attention, favour, regard, inclination
अना = Self, Ego

झरिन = golden, glittering
चकाचौंध = dazzled
इल्तिज़ा = request

इम्तिहाँ = exam, trial, test

मैत्री-कारण

“मित्रों” म्हणून आम्ही कधी ना साद कोणा घातली
अन त्या मिषाने ना आम्ही भीती कुणाला घातली
 
माया नी ममताच्या सवे, स्मृती जागवतो जुन्या
रम्या, मिमी, नुसरत जहां, साऱ्या सख्या अमुच्या नव्या
 
मैत्री करू पप्पू सवे, इतके बुळे नाही आम्ही
स्वप्नातही हातात देऊ हात ना त्याच्या कधी
 
साहेब जातील तीच नेहमी पूर्व का असते दिशा
बेरीज चुकता मित्रांसकट ही पाहवेना दुर्दशा
 
करतील मित्रांचीच निंदा स्वयंघोषित हे स्वयंभू
सत्तेपरी करती युती, पश्चात धोरण दग्धभू
 
समजू नका आम्हास नाही कोणी मैतर सोयरा
मैत्रीत आता सोवळा होई उद्या तो ओवळा
 
चाणाक्ष ते करतील मैत्री, सत्ता आम्हां मिळता पहा
मंत्री करू, गुंडांस ना दावू तुरुंगाची हवा

मैत्री

पुळणीवरची वाळू सर्रकन
बोटांमधुनी निसटून जाते
ओले असतील जे जे कण ते
हातावरती सोडून जाते

असे काहीसे नाते असते
ज्याच्या त्याच्या मैत्रीमधले
जीवन अवघे निसटत असता
मनात उरती क्षण ओलेते

मैत्रीच्या धाग्याची टोके
दिवसामाजी लांबत जाती
जितकी जातील दूर तेवढी
वीण नात्याची घट्ट बांधती

सुगंध असतो दोन्हीं मध्ये
लावा अत्तर वा फव्वारा
किती वेळ तो दरवळतो हा
फरक ओळख अन् मैत्री मधला

दूध उकळता चूल्ह्यावरती
घट्ट साय ती जमते वरती
उकळून येता सारे जीवन
त्यातून तरते निखरते मैत्री

पैसा जमवा तो ही बक्कळ
नाती गोती असती पुष्कळ
हे न पुरेसे, पण पुरे खरे तर
जिवलग एक जीवाचा मैतर

शायरी

दोष मी त्यांना दिला, ज्यांनी व्यथा मजला दिली
आभार त्यांचे मानतो, शायरी सुद्धा दिली

मांडण्यासाठी व्यथा, मग मीही सरसावलो पुढे
पाडल्या जिलब्या नि चकल्या, अन मांडल्या त्यांच्या पुढे

म्हणतील कडबोळी कुणी, होते मला हे माहिती
‘एकदम कडक’ म्हणतील हे, ना वाटले स्वप्नातही

चमचमीत असते चकली, कुरकुरीत अन गोड जिलबी
काय ही शायरी! म्हणाले, कडबोळी बरी याहूनही

थांबले नाहीत येथे, बोलले ते त्या पुढे
सोडा तुम्ही झारा नि कढई, उपकार होतील केवढे

ठरविले मग मीही काही, गाठून म्हणलो एकएका
वेळ येता भीक मागा, शायर कधी होऊ नका

लागू पडली हीच मात्रा, ते लागले करू शायरी
विचारती मग एकमेका, आहे बरी की चांगली?

नुसतीच नाही घेतली माझी त्यांनी शायरी
आभार त्यांचे मानतो, माझी व्यथा ही घेतली

प्रश्नच कळले नाही

प्रश्नच कळले नाही
उत्तर लिहीत बसलो
वायद्यात फायदा होता
कायदा पाळत बसलो

फाटे फुटले तेव्हा
कौल लावून वळलो
कौल चुकले तेव्हा
चालायचेच म्हणालो

प्रचंड दाटून येता
मनी उगाळत बसलो
गाळून उरला चोथा
मी त्याला सत्व समजलो

नव्या संधींना टाळून
जुने कवटाळून बसलो 
जगणे तर टळले नाही
मरणाला चुकवत फिरलो

खूण वयाची झाकू कशी मी – लावणी

गावात आला नवा नवा ह्यो ***
गावात आला नवा नवा नाही हिशोब त्याचा मुदलात
नजरेमधूनी सावकार म्हणतो तुला विकत घेईन व्याजात

कशी बशी मी झाकून घेते
कशी बशी मी झाकून घेते मला ग या नव्वारीत
खूण वयाची झाकू कशी मी तंग माझ्या चोळीत

येत्या सुगीला शिवेन चोळी
येत्या सुगीला शिवेन चोळी ह्यो -हायला ईच्चार डोस्क्यात
उपेग नाही बुजगावण्याचा आली टोळधाड जोसात

भीती वाटते होईल भलतेच
भीती वाटते होईल भलतेच लागता डोळा शिवारात
लबाड लांडगं घुसू पहातंय भरल्या माझ्या शेतात

देऊ का त्याला? ठेवील का तो?
देऊ का त्याला? ठेवील का तो? ठेव सुखरूप खात्यात
काळीज उडतंय कवापासनं माझ्या छातीच्या भात्यात

वाचन सुरू ठेवा “खूण वयाची झाकू कशी मी – लावणी”