खोटं बोलले तर बोलू दे

काय पेक्षा कोण बोलले
हे फार महत्वाचं आहे
हे सुद्धा पु. ल. बोलले
ही त्यातली खोच आहे

तुम्हाला म्हणून सांगतो
इतकी घाई करू नका
खोटं बोलले तर बोलू दे
कोण बोलले हे तर पहा

जर ते असेल लहान मूल
तर ते मोठ्ठं पाप आहे
मात्र असेल माणूस प्रौढ
तर ती क्षुल्लक चूक आहे

वेळप्रसंगी खोटं बोलणं
प्रेमिकांना भाग आहे
जुने दिवस आठवून हसणं
हेच तुमच्या हातात आहे

कचेरीत साहेबासाठी
वर चढण्याचा मार्ग आहे
आणि राजकारण्यांची
ती मुलभूत गरज आहे

खूप खूप नशीबवान अशा
अविवाहितांचा धर्म आहे
आणि सुखी विवाहितांच्या
संसाराचे मर्म आहे

    (आधारित)

यावर आपले मत नोंदवा