किंचित अस्वस्थ वाटते आहे !

उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे?
याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे !

उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा
वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे

समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो
समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे?

होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा
खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे?

काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे?
राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे?

इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन्
उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे?

घडत्या घटनांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे
दुर्लक्ष करा असे कोणी निक्षून सांगते आहे
(किंचिततेचे तुम्हास का भय भेडसावते आहे?)
(किंचिततेचे तुम्हास का आश्चर्य दाटते आहे?)

यावर आपले मत नोंदवा