ना-दान

का करू दान? कोण जगी या सत्पात्र?
पात्रं अनेक ईथे, नसे कोणी सगोत्र!

का उद्धारू पिडीत, मी आयुष्य वेचून?
सरकार हे निकम्मे, का देती ते निवडून?

का देऊ त्यांना, बंदा रुपया खिशातील?
करून भांडवल, मलाच ते पिळतील!

कशी देऊ दृष्टी माझी, डोळस बेधुंद!
असो डोळे वा नसो, विचाराने ते अंध!

गाळते विष आस्तिक, माझे मुत्रपिंड!
शिवे ज्याला कावळा, पात्र नसे तो पिंड!

शोधले देह अनेक, देण्या मी यकृत!
पापभिरू सारे, तरी नाही अविकृत!

का वाहू समिधा, देह अखंड देऊन?
का जगवू पिशाच्चे, माझा अर्क पाजून?

यावर आपले मत नोंदवा